Pwdva act 2005 कलम ३४ : संरक्षण अधिकाऱ्याने केलेल्या अपराधाची दखल :
महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ कलम ३४ : संरक्षण अधिकाऱ्याने केलेल्या अपराधाची दखल : संरक्षण अधिकाऱ्याने केलेल्या अपराधासाठी राज्य शासनाची किंवा त्याने याबाबतीत प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याची पूर्वमंजुरी घेऊन तक्रार दाखल करण्यात आलेली असल्याखेरीज त्याच्याविरूद्ध कोणताही खटला किंवा इतर कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार नाही.