Fssai कलम १७ : अन्न (खाद्य) प्राधिकरणाची कार्यवाही :
अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम १७ : अन्न (खाद्य) प्राधिकरणाची कार्यवाही : १) अन्न (खाद्य) प्राधिकरणाची बैठक मुख्यालयात किंवा इतर कोणत्याही कार्यालयात अध्यक्षांनी निर्देशित केलेल्या वेळेवर होईल, आणि या बैठकीत (त्याच्या बैठकीचे आवश्यक गणपूर्तीसह) बैठकीतील कामकाजाच्या व्यवहारासंबंधीच्या प्रक्रियामध्ये अशा नियमांचे पालन केले जाईल…