Bsa कलम १४४ : दस्तऐवज हजर करणाऱ्या साक्षीदाराची उलटतपासणी :
भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १४४ : दस्तऐवज हजर करणाऱ्या साक्षीदाराची उलटतपासणी : दस्तऐवज हजर करण्यासाठी समन्स काढण्यात आलेल्या व्यक्तीने तो हजर केला एवढ्याच कारणाने ती साक्षीदार होत नाही; आणि तिला साक्षीदार म्हणून बोलावण्यात आल्याशिवाय व येईतोपर्यंत तिची उलटतपासणी होऊ शकत नाही.