Bp act कलम १२५ : सरकारी रुग्णालयात-बराकीत-लढाऊ जहाजावर स्पिरीट वगैरे घेऊन जाणे:
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १२५ : सरकारी रुग्णालयात-बराकीत-लढाऊ जहाजावर स्पिरीट वगैरे घेऊन जाणे: जो कोणी,- अ) कोणत्याही सरकारी रुग्णालयात अशा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या परवानगीवाचून, कोणतीही दारु किंवा दारु असलेली किंवा आंबवलेली मादक द्रव्ये किंवा मादक औषधी किंवा कैफआणणारे तयार केलेले पदार्थ घेऊन जाईल किंवा…