Mv act 1988 कलम १२० : डाव्या बाजूला नियंत्रक असणारी वाहने :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १२० : डाव्या बाजूला नियंत्रक असणारी वाहने : कोणत्याही व्यक्तीने डाव्या हाताला चालविण्याचे (स्टिअरिंग) नियंत्रक असणाऱ्या वाहनाला यांत्रिक किंवा विद्युत दिशा निदेशक बसविण्यात आलेला असल्याशिवाय आणि तो चालू स्थितीत असल्याशिवाय कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी असे वाहन चालविता कामा नये.