Constitution अनुच्छेद १२५ : न्यायाधीशांचे वेतन, इत्यादी :
भारताचे संविधान ( राज्यघटना ) अनुच्छेद १२५ : न्यायाधीशांचे वेतन, इत्यादी : १.((१) संसद, कायद्याद्वारे निर्धारित करील असे वेतन सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना दिले जाईल आणि, त्या बाबतीत तशी तरतूद केली जाईपर्यंत, दुसऱ्या अनुसूचीत विनिर्दिष्ट करण्यात आलेले वेतन दिले जाईल.) (२) प्रत्यके न्यायाधीश, संसदेने केलेल्या कायद्याद्वारे…