SCST Act 1989 कलम ४ : कर्तव्यात कसूर (हयगय) करण्याबद्दल शिक्षा :

अनुसूचित जाती व जमाती अधिनियम १९८९
कलम ४ :
१.(कर्तव्यात कसूर (हयगय) करण्याबद्दल शिक्षा :
१)लोकसेवक असेल परंतु अनुसूचित जनजातीचा सदस्य नसेल अशी जी कोणतीही व्यक्ति, या अधिनियमाखाली किंवा या अधिनियमान्वये तिने जी कर्तव्ये पार पाडणे आवश्यक असेल ती कर्तव्ये पार पाडण्यात जाणूनबुजून कसूर किंवा हयगय करील त्या व्यक्तिला सहा महिन्यापेक्षा कमी नसेल परंतु एक वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या तुरुंगवासाची शिक्षा होईल.
२)पोट-कलम (१) मध्ये नमूद केल्याप्रमाणे लोकसेवकाच्या कर्तव्यामध्ये पुढील बाबींचा समावेश असेल-
(a) क)माहिती देणाऱ्याने दिलेली तोंडी माहिती देणाऱ्याला वाचून दाखवावयाची असून ती पोलीस ठाणे किंवा स्टेशनच्या मुख्य अधिकाऱ्याने माहिती देणाऱ्याची सही घेण्याआगोदर लिहून घ्यावयाची आहे.
(b) ख) या अधिनियमाखाली आणि इतर तरतुदींअन्वये तक्रारीची नोंद करणे किंवा प्राथमिक माहितीच्या अहवालाची नोंद करणे आणि अधिनियमातील योग्य त्या कलमाखाली नोंद करणे.
(c) ग)माहिती देणाऱ्याला नोंद केलेल्या माहितीची प्रत देणे.
(d) घ)अत्याचारीत किंवा अत्याचार झालेल्या पिडितांचा किंवा साक्षीदारांचा जबाब नोंदवून घेणे.
(e) ड)चौकशी करणे आणि दोषारोप पत्र, विशेष न्यायालयात किंवा ऐकमेव विशेष न्यायालयात साठ दिवसांच्या आत दाखल करणे, आणि जर विलंब झाला तर त्या कारणांची लोखी नोंद देणे.
(f) च)कागदपत्रांचे किंवा इलेक्टड्ढॉनिक लेखांची व्यवस्थित तयारी करणे, रचना करणे आणि भाषांतर करणे.
(g) छ)या अधिनियमात किंवा नियमात विनिर्दिष्ट केलेले इतर कोणतेही कर्तव्य करणे.
परंतु असे की, लोकसेवकाच्या विरुद्ध केलेले याबाबतीतील दावे हे कार्यालयीन चौकशीअन्वये शिफारशीनंतर केले जातील.
३)पोटकलम (२) मध्ये नमूद केलेली लोकसेवकाची कोणतीही कर्तव्यांची हयगय केली असल्यास त्याची दखल विशेष न्यायालय किंवा एकमेव (अनन्य) न्यायालयाने घ्यावयाची आहे आणि लोकसेवकाविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याची ते शिफारस करतील. )
———-
१. २०१६ चा अधिनियम क्रमांक १ याच्या कलम ५ अन्वये कलम ४ ऐवजी समाविष्ट करण्यात आले. (२६-१-२०१६ पासून)

Leave a Reply