अनुसूचित जाती व जमाती अधिनियम १९८९
कलम १५ :
१.(विशेष सरकारी अभियोक्ता आणि एकमेव (अनन्य) सरकारी अभियोक्ता :
१)राज्यशासन प्रत्येक विशेष न्यायालयात खटले चालविण्याकरिता, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून एखाद्या सरकारी अभियोक्तयास विनिर्दिष्ट करील किंवा अधिवक्ता म्हणून सात वर्षापेक्षा कमी नसतील इतकी वर्षे व्यवसाय करीत असलेल्या अभियोक्त्याची नेमणूक करील.
२)राज्य शासन प्रत्येक एकमेव (अनन्य) विशेष न्यायालयात खटले चालविण्यासाठी शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे एकमेव (अनन्य) विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून एखाद्या सरकारी अभियोक्त्यासविनिर्दिष्ट करील किंवा अधिवक्ता म्हणून सात वर्षापेक्षा कमी नसतील इतकी वर्षे व्यवसाय करीत असलेल्या एकमेव (अनन्य) विशेष सरकारी अभिवक्ता म्हणून नेमणूक करील. )
——–
१. २०१६ चा अधिनियम क्रमांक १ याच्या कलम १० द्वारा मूळ कलमाऐवजी (२६-१-२०१६ पासून) समाविष्ट करण्यात आले.