Phra 1993 कलम ५ : १.(सभाध्यक्षा आणि आयोगाच्या सदस्याचा राजीनामा आणि पदावरुन दूर करणे :

मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३
कलम ५ :
१.(सभाध्यक्षा आणि आयोगाच्या सदस्याचा राजीनामा आणि पदावरुन दूर करणे :
१) अध्यक्ष किंवा कोणताही सदस्य राष्ट्रपतींना उद्देशून त्याच्या हस्ताक्षरात लिखित सुचने द्वारे त्याच्या पदाचा त्याग करु शकतो.
२) पोटकलम (३) च्या उपबंधाच्या अधीनतेने, आयोगाचा सभाध्यक्ष किंवा अन्य कोणताही सदस्य याच्या बाबतीत राष्ट्रपतीने सर्वोच्च न्यायालयाकडे निर्देश केल्यावरुन त्या न्यायालयाने त्या संबंधात विहित करण्यात आलेल्या कार्य पद्धतीनुसार चौकशी करुन नंतर, त्या सभाध्यक्षास किंवा, यथास्थिति, अशा अन्य सदस्यास, शाबीत झालेल्या दुर्वर्तनाच्या किंवा असमर्थतेच्या कारणास्तवर पदावरुन दूर करावयास पाहिजे, असा अभिप्राय कळवल्यानंतरच, राष्ट्रपतीच्या आदेशाद्वारे अशा कोणत्याही कारणास्तव त्याला त्याच्या पदावरुन दूर केले जाईल.
२) पोटकलम (२) मध्ये काहीही अंतर्भूत केलेले असले तरी, जर समितीचा सभाध्यक्ष किंवा यथास्थिति, असा अन्य सदस्य जर, –
(a)क)(अ) नादार म्हणून अभिनिर्णीत झाला असेल तर; किंवा
(b)ख)(ब) त्याच्या पदावधीत त्याच्या पदाच्या कर्तव्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही वेतनी सेवेत काम करीत असेल तर; किंवा
(c)ग)(क) मानसिक किंवा शारीरिक दुर्बलतेमुळे त्या पदावर राहण्यास अयोग्य ठरत असेल तर; किंवा
(d)घ)(ड) विकल मनाचा असेल व सक्षम न्यायालयाने तसे घोषित केलेले असेल तर; किंवा
(e)ङ)(इ) सिद्धदोषी असेल आणि राष्ट्रपतीच्या मते नैतिक अध:पतनाचा अंतर्भाव असलेल्या अपराधासाठी त्याला कारावासाची शिक्षा झालेली असेल तर,
राष्ट्रपती, त्या सभाध्यक्षास किंवा अन्य कोणत्याही सदस्यास आदेशाद्वारे पदावरुन दूर करु शकेल.)
——–
१. २००६ चा अधिनियम क्रमांक ४३ याच्या कलम ५ अन्वये मूळ कलमा ऐवजी समाविष्ट करण्यात आला.

Leave a Reply