मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३
कलम ३३ :
राज्य शासनाकडून अनुदाने :
१) राज्य शासन, विधानमंडळाकडून या बाबतीतील कायद्याद्वारे विनियोजन करण्यात आल्यानंतर या अधिनियमाच्या प्रयोजनांसाठी उपयोजित करण्याकरिता राज्य शासनाला योग्य वाटेल इतकी रक्कम अनुदानाच्या मार्गाने आयोगाला देईल.
२) प्रकरण पाच खालील कार्ये पार पाडण्यासाठी राज्य आयोगाला योग्य वाटेल एवढी रक्कम आयोग खर्च करील आणि ती रक्कम पोट-कलम (१) मध्ये निर्देशित केलेल्या अनुदानामधून देय असलेला खर्च असल्याचे मानण्यात येईल.