मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३
प्रकरण ७ :
वित्त व्यवस्था, लेखे आणि लेखापरीक्षा :
कलम ३२ :
केंद्र सरकारकडून अनुदाने :
१) केंद्र सरकार, संसदेकडून या बाबतीतील कायद्याद्वारे योग्य विनियोजन करण्यात आल्यानंतर, या अधिनियमाच्या प्रयोजनासाठी उपयोजित करण्याकरिता केंद्र सरकारला योग्य वाटेल इतकी रक्कम अनुदानाच्या मार्गाने आयोगाला देईल.
२) या अधिनियमाखालील कार्ये पार पाडण्यासाठी आयोगाला योग्य वाटेल एवढी रक्कम आयोग खर्च करील आणि ती रक्कम पोट-कलम (१) मध्ये निर्देशित केलेल्या अनुदानामधून देय असलेला खर्च असल्याचे मानण्यात येईल.