मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३
कलम २ :
व्याख्या :
१) या अधिनियमत, संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर, –
(a)क)(अ) सशस्त्र दले याचा अर्थ, नौसेना, भूसेना व वायुसेना असा असून त्यामध्ये संघ राज्याच्या कोणत्याही अन्य सशस्त्र दलांचा समावेश होतो;
(b)ख)(ब) सभाध्यक्ष याचा अर्थ, आयोगाचा किंवा, यथास्थिति, राज्य आयोगाचा सभाध्यक्ष असा आहे;
(ba)१.(खक)(बअ) मुख्य आयुक्त याचा अर्थ अपंग (विकलांग) व्यक्ती अधिनियक २०१६ च्या कलम ७४ च्या पोटकलम (१) मध्ये निर्दिष्ट अपंग (विकलांग) व्यक्तींसाठी मुख्य आयुक्त असा आहे.)
(c)ग)(क) आयोग याचा अर्थ, कलम ३ अन्वये घटित केलेला राष्ट्रीय मानवी हक्क आयोग, असो आहे.
(d)घ)(ड) मानवी हक्क याचा अर्थ, संविधानाद्वारे हमी दिलेले किंवा आंतरराष्ट्रीय प्रसंविदेमध्ये संनिविष्ट केलेले आणि भारतामध्ये न्यायालयाद्वारे अंमलात आणण्याजोगे असलेले, व्यक्तीचे जीवन, स्वातंत्र्य, समानता व प्रतिष्ठा या संबंधातील हक्क, असा आहे;
(e)ङ) (इ) मानवी हक्क न्यायालय याचा अर्थ, कलम ३० अन्वये विनिर्दिष्ट केलेले मानवी हक्क न्यायालय, असा आहे.
(f)२.(च)(फ) आंतरराष्ट्रीय प्रसंविदा (करार) याचा अर्थ, नागरी व राजकीय हक्कांवरील आंतरराष्ट्रीय प्रसंविदा आणि १६ डिसेंबर, १९६६ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये स्वीकारण्यात आलेली आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक हक्कांवरील आंतरराष्ट्रीय प्रसंविदा, आणि संयुक्त राष्ट्राच्या महासभेने स्वीकारलेले असे इतर करार, ते त्या त्या वेळी केन्द्र सरकार अधिसूचनेद्वारे विनिदिष्ट करेल, असा आहे;)
(g)२.(छ)(ग) सदस्य याचा अर्थ, यथास्थिति, आयोगाचा किंवा राज्य आयोगाचा सदस्य असा आहे.)
(ga)१.(छक)(गअ) मागासवर्गीय राष्ट्रीय आयोग याच्या अर्थ राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग अधिनियम १९९३ याच्या कलम ३ अधीन स्थापन केलेले मागासवर्गीय राष्ट्रीय आयोग असा आहे.)
(h)ज)(ह) राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग याचा अर्थ, राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग अधिनियम, १९९२ (१९९२ चा १९) याच्या कलम ३ अन्वये घटित केलेला राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग, असा आहे;
(ha)१.(जक)(हअ) राष्ट्रीय बालक संरक्षण आयोग याचा अर्थ बालक अधिकार संरक्षण आयोग अधिनियम २००५ याच्या कलम ३ अधीन स्थापन केलेले राष्ट्रीय बालक संरक्षण आयोग असा आहे.)
(i)२.(झ)(आय) अनुसूचित जाती राष्ट्रीय आयोग याचा अर्थ, संविधानाच्या अनुच्छेद ३३८ मध्ये निर्दिष्ट केलेला राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग असा आहे.
(ia)झक)(आयअ) अनुसूचित जनजाती राष्ट्रीय आयोग याचा अर्थ, संविधानाच्या अनुच्छेद ३३८क मध्ये निर्दिष्ट केलेला अनुसूचित जनजाती राष्ट्रीय आयोग असा आहे.)
(j)ञ)(जे) राष्ट्रीय महिला आयोग याचा अर्थ, राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम, १९९० (१९९० चा २०) याच्या कलम ३ अन्वये घटित केलेला राष्ट्रीय महिला आयोग, असा आहे;
(k)ट)(के) अधिसूचना याचा अर्थ, शासकीय राजपत्रामध्ये प्रकाशित केलेली अधिसूचना, असा आहे;
(l)ठ)(एल) विहित याचा अर्थ, या अधिनियमान्वये करण्यात आलेल्या नियमांद्वारे विहित असा आहे;
(m)ड)(एम) लोकसेवक याला भारतीय दंड संहितेच्या (१९६० चा ४५) कलम २१ मध्ये नेमून दिलेला अर्थ असेल;
(n)ढ)(एन) राज्य आयोग याचा अर्थ, कलम २१ अन्वये घटित केलेला राज्य मानवी हक्क आयोग असा आहे.
२) जो कायदा जम्मू व काश्मीर या राज्यामध्ये अंमलात नाही, त्या कायद्याचा या अधिनियमात त्या राज्याच्या संबंधात केलेल्या कोणत्याही उल्लेखाचा अन्वयार्थ, त्या राज्यात जर, कोणताही तत्सम कायदा अंमलात असेल तर, त्या कायद्याचा उल्लेख म्हणून लावला जाईल.
——-
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक १९ याच्या कलम २ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
२. २००६ चा अधिनियम क्रमांक ४३ याच्या कलम २ अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.