मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३
कलम २९ :
राष्ट्रीय मानवी हक्क आयोगासंबंधातील विवक्षित उपबंध राज्य आयोगांना लागू असणे :
कलमे ९, १०, १२, १३, १४, १५, १६, १७ आणि १८ यांचे उपबंध राज्य आयोगाला लागू असतील आणि खालील फेरबदलाच्या अधीनतेने ते प्रभावी होतील :-
(a)क)(अ) आयोग या उल्लेखाचा अन्वयार्थ राज्य आयोग असा लावण्यात येईल ;
(b)ख)(ब) कलम १० च्या पोट-कलम (३) मध्ये महासचिव या शब्दाऐवजी सचिव हा शब्द दाखल करण्यात येईल ;
(c)ग)(क) कलम १२ चा खंड (च) वगळण्यात येईल ;
(d)घ)(ड) कलम १७ च्या खंड (एक) मधील केंद्र सरकार किंवा कोणतेही हे शब्द वगळण्यात येतील.