Phra 1993 कलम २५ : सदस्याने,विशिष्ट परिस्थितीत सभाध्यक्ष म्हणून काम पाहणे किंवा त्याची कर्तव्ये पार पाडणे :

मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३
कलम २५ :
सदस्याने,विशिष्ट परिस्थितीत सभाध्यक्ष म्हणून काम पाहणे किंवा त्याची कर्तव्ये पार पाडणे :
१) सभाध्यक्षाचे निधन झाल्याने, त्याने राजीनामा दिल्याने किंवा अन्य कोणत्याही त्याचे पद रिक्त झाल्यास त्या प्रसंगी राज्यपाल, अधिसूचनेद्वारे, असे रिक्त पद भरण्यासाठी सभाध्यक्षाची नियुक्ती होईपर्यंत, एखाद्या सदस्याला त्या पदाची कामे पार पाडण्यास प्रधिकृत करील.
२) जेव्हा, सभाध्यक्ष रजेवर असल्यामुळे किंवा अन्य कारणास्तव अनुपस्थित असल्याने आपली कर्तव्ये पार पाडण्यास असमर्थ असेल तेव्हा, राज्यपाल अधिसूचनेद्वारे या संदर्भात प्राधिकृत करील असा अन्य एक सदस्य, सभाध्यक्ष रजेवरुन परत रुजू होईपर्यंतच्या दिनांकापर्यंत सभाध्यक्षाची कर्तव्ये पार पाडील.

Leave a Reply