Phra 1993 कलम १९ : सशस्त्र दलाच्या संबंधात कार्यपद्धती :

मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३
कलम १९ :
सशस्त्र दलाच्या संबंधात कार्यपद्धती :
१) या अधिनियमामध्ये काहीही अंतर्भत केलेले असले तरी, सशस्त्र दलांच्या सदस्यांनी मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याच्या तक्रारीबाबत कार्यवाही करताना आयोग पुढील कार्यपद्धती स्वीकारील;
ती म्हणजे :-
(a)क)(अ) स्वत:हून किंवा विनंती अर्ज आल्यावर केंद्र सरकारकडून अहवाल मिळण्याची मागणी करील;
(b)ख)(ब) अहवाल प्राप्त झाल्यानंतर, तो एकतर तक्रारीबाबत कार्यवाही करणार नाही, किंवा यथास्थिति, आपल्या शिफारशी शासनाकडे पाठवील.
२) केंद्र सरकार, आयोगाला, तीन महिन्यांच्या आत किंवा आयोग परवानगी देईल तेवढ्या वाढीव कालावधीमध्ये शिफारशींवर केलेल्या कारवाईबाबत कळवील.
३) आयोग, केंद्र सरकारकडे केलेल्या शिफारशी आणि अशा शिफारशींवर शासनाने केलेल्या कारवाईसह आपला अहवाल प्रकाशित करील.
४) आयोग, पोटकलम (३) अन्वये प्रसिद्ध केलेल्या अहवालाची प्रत विनंती अर्जदाराला किंवा त्याच्या प्रतिनिधीला पुरवील.

Leave a Reply