मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३
कलम १८ :
१.(चौकशी दरम्यान आणि चौकशीनंतरची कारवाई :
आयोग, या अधिनियमाखाली करण्यात आलेली एखादी चौकशी पूर्ण झाल्यानंतर आयोग निम्नलिखित कारवाई करु शकेल , त्या अशा :-
(a)क)(अ) जथे आयोगाने केलेल्या चौकशीमधून, लोकसेवकाने मानवी हक्कांचचा भंग केला किंंवा मानवी हक्कांच्या भंगास प्रतिबंध करण्यात हयगय केली किंवा मानवी हक्कांच्या भंगास प्रोत्साहन दिले, असे दिसून येईल तेथे, आयोग संबंधित शासनास किवा प्राधिकरणास –
एक) तक्रार करणाऱ्या व्यक्तीला किंवा बळी पडलेल्या व्यक्तीला किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांना, आयोगाला आवश्यक वाटेल असे तत्काळ अंतरिम सहाय्य किंवा नुकसान भरपाई देण्यासाठी शिफारस करील ;
दोन) संबंधित व्यक्तीविरुद्ध किंवा व्यक्तीविरुद्ध, अभियोगांची कार्यवाही सुरु करण्याची किंवा आयोगाला योग्य वाटेल अशी इतर कार्यवाही करण्याची शिफारस करील;
तीन) आयोगाला योग्य वाटेल अशी अन्य कारवाई करण्याची शिफारस करील;
(b)ख)(ब) सर्वोच्च न्यायालयाकडे किंवा संबंधित उच्च न्यायालयाकडे त्यास आवश्यक वाटतील असे निदेश, आदेश किंवा रिट यांकरिता विचारणा करील;
(c)ग) (क)चौकशीच्या कोणत्याही टप्प्यावर बळी पडलेल्या व्यक्तीला किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांना, आयोगाला आवश्यक वाटेल असे तत्काळ अंतरिम सहाय्य देण्यासाठी संबंधित शासनाकडे किंवा प्राधिकरणाकडे शिफारस करील ;
(d)घ) (ड) खंड (ङ) च्या उपबंधाना अधीन राहून विनंती अर्जदाराला किंवा त्यांच्या प्रतिनिधीला चौकशी अहवालाची प्रत पुरवील ;
(e)ङ)(इ) आयोग, आपल्या चौकशी अहवालाची प्रत त्याच्या शिफारशींसह संबंधित शासनाकडे किंवा प्राधिकरणाकडे पाठवील आणि संबंधित शासन किंवा प्राधिकरण, एक महिन्याच्या कालावधीमध्ये किंवा आयोग परवानगी देईल तेवढ्या वाढीव कालावधीमध्ये अहवालावरील आपला शेरा, त्यावर घेतलेल्या कार्यवाहीसह किंवा घ्यावयासाठी प्रस्तावित असलेल्या कार्यवाहीसह, आयोगाकडे सादर करील.
(f)च) (फ) आयोग, संबंधित शासनाच्या किंवा प्राधिकरणाच्या,जर काही असल्यास, भाष्यासह आणि आयोगाच्या शिफारशींवर संबंधित शासनाने किंवा प्राधिकरणाने घेतलेल्या किंवा घ्यावयासाठी प्रस्तावित केलेल्या कार्यवाहीसह आपला चौकशी प्रसिद्ध करील.)
——–
१. २००६ चा अधिनियम क्रमांक ४३ याच्या कलम ११ अन्वये मूळ कलमा ऐवजी समाविष्ट करण्यात आले.