मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३
प्रकरण ४ :
कार्यपद्धती :
कलम १७ :
तक्रारींबाबत चौकशी :
आयोग, मानवी हक्कभंगाबाबतच्या तक्रारींची चौकशी करताना, –
एक) केंद्र सरकार किंवा कोणतेही राज्य शासन किंवा त्यांना दुय्यम असणारे इतर कोणतेही प्राधिकरण किंवा संघटना यांच्याकडून तो विनिर्दिष्ट करील त्यावेळेत माहिती किंवा अहवाल मागवील :
परंतु,-
(a)क)(अ) आयोगाने विहित केलेल्या कालावधीत माहिती किंवा अहवाल प्राप्त झाला नाही तर, आयोग स्वत: तक्रारीच्या चौकशीची कार्यवाही करील;
(b)ख)(ब) आयोगाकडे माहिती किंवा अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील चौकशीची आवश्यकता नाही किंवा संबंधित शासनाकडून किंवा प्राधिकरणाकडून कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे किंवा कार्यवाही करण्यात आली आहे याबाबत आयोगाची खात्री झाली तर, आयोग त्या तक्रारीवर कार्यवाही करणार नाही व तक्रारदारास तसे कळवील.
दोन) खंड (एक) मध्ये अंतर्भूत असलेल्या कोणत्याही गोष्टीस बाध न आणता, तक्रारीचे स्वरुप विचारत घेता चौकशी करणे आवश्यक आहे असे त्यास वाटल्यास चौकशी सुरु करण्यात येईल.