मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३
कलम १० :
आयोगाने प्रक्रिया विनियमित करणे :
१) सभाध्यक्षास योग्य वाटेल अशावेळी व अशा ठिकाणी आयोगाची बैठक होईल.
२) आयोग, त्याची स्वत:ची प्रक्रिया विनियमित करेल.
१.(२) या अधिनियमाला आणि अधिनियमा अंतर्गत केलेल्या नियमांना अधीन राहून, आयोगाला स्वत:च्या कार्यपद्धतीसाठी नियमावली मांडण्याचा अधिकार असेल.)
३) आयोगाचे सर्व आदेश आणि निर्णय, महासचिव किंवा सभाध्यक्षाने त्या संदर्भात रीतसर प्राधिकृत केलेला आयोगाचा अन्य अधिकारी अधिप्रमाणित करील.
——–
१.२००६ चा अधिनियम क्रमांक ४३ याच्या कलम ८ अन्वये मूळ पोटकलमा ऐवजी समाविष्ट करण्यात आले.