Pcr act कलम ८: विवक्षित प्रकरणी लायसने रद्द करणे किंवा निलंबित करणे :

नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५
कलम ८:
विवक्षित प्रकरणी लायसने रद्द करणे किंवा निलंबित करणे :
कलम ६ खालील अपराधाबद्दल दोषी ठरवण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीने, अपराध ज्याच्या बाबतीत करण्यात आला, तो पेशा उदीम, आजीविका किंवा नोकरी याबाबत त्या त्या वेळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्याखाली ज्या शिक्षेला पात्र असेल तिला बाधा न येता, अपराधाची संपरीणा करणारे न्यायालय, लायसन रद्द ठरवण्याचा किंवा न्यायालयाला योग्य वाटेल अशा कालावधीपुरते ते निलंबित करण्याचा निदेश देऊ शकेल आणि त्याप्रमाणे लायसन रद्द करणारा किंवा निलंबित करणारा प्रत्येक आदेश, जणूकाही तो अशा कोणत्याही कायद्याखाली लायसन रद्द किंवा निलंबित करण्यात सक्षम असलेल्या अधिकरणाने काढलेला असावा त्याप्रमाणे परिणामक होईल.
स्पष्टीकरण:
या कलमात, परवान्यामध्ये परवाना किंवा परवानगी देखील समाविष्ट आहे.

Leave a Reply