नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५
कलम ५:
रुग्णालये, इत्यादींमध्ये व्यक्तींना प्रवेश नाकारण्याबद्दल शिक्षा :
जो कोणी, अस्पृश्यते च्या कारणावरुन-
(a)(क)(अ) एखादे रुग्णालय, दवाखाना, शिक्षण संस्था किंवा १.(***) एखादे वसतिगृह हे सर्वसाधारण जनतेच्या किंवा त्यापैकी, एखाद्या वर्गाच्या फायद्यासाठी स्थापन झालेले किंवा चालवलेले असताना असे रुग्णालय, दवाखाना, शिक्षण संस्था किंवा वसतिगृह यामध्ये एखाद्या व्यक्तीला प्रवेश नाकारील;किंवा
(b)(ख)(ब) पूर्वोक्त संस्थापैकी कोणत्याही संस्थेत प्रवेश दिल्यानंतर, त्यामुळे अशा कोणत्याही व्यक्तीला प्रतिकूल असा भेदभाव होतो असे कोणतेही कृत्य करील.
तो २.(एक महिन्याहून कमी नाही आणि सहा महिन्यांहून जास्त नाही इतक्या मुदतीच्या कारावासास व शंभर रुपयांहून कमी नाही व पाचशे रुपयांहून जास्त नाही अशा द्रव्यदंडासही पात्र होईल.)
——-
१. १९७६ चा अधिनियम क्रमाकं १०६ याच्या कलम ७ द्वारे तिला संलग्न असलेले हे शब्द गाळले.
२. १९७६ चा अधिनियम क्रमाकं १०६ याच्या कलम ७ द्वारे मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.