Pcr act कलम १४अ(क) : १.(सद्भावपूर्वक करण्यात आलेल्या कारवाईंना संरक्षण :

नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५
कलम १४अ(क) :
१.(सद्भावपूर्वक करण्यात आलेल्या कारवाईंना संरक्षण :
(१) या अधिनियमाखाली सद्भावपूर्वक केलेल्या किंवा करण्याचे योजलेल्या अशा कोणत्याही गोष्टीबद्दल केंद्र शासन किंवा एखादे राज्य शासन यांच्याविरुद्ध दावा, खटला किंवा इतर वैध कार्यवाही होऊ शकणार नाही.
(२) या अधिनियमाखाली सद्भावपूर्वक केलेल्या किंवा करण्याचे योजलेल्या अशा कोणत्याही गोष्टीमुळे झालेल्या किंवा होण्याचा संभव असलेल्या कोणत्याही नुकसानाबद्दल केंद्र शासन किंवा एखादे राज्य शासन याच्याविरुद्ध दावा, खटला किंवा इतर वैध कार्यवाही होऊ शकणार नाही.)
——–
१. १९७६ चा अधिनियम क्रमांक १०६ याच्या कलम १६ अन्वये (१९-११-१९७६ पासून) समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply