नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५
कलम ११:
नंतरच्या दोषसिद्धीस वाढीव शास्ती :
जो कोणी, या अधिनियमाखालील अपराधांबद्दल किंवा अशा अपराधाला अपप्रेरणा दिल्याबद्दल अगोदर दोषी ठरलेला असून अशा कोणत्याही अपराधाबद्दल किंवा अपप्रेरणेबद्दल पुन्हा दोषी ठरेल तो, १.(दोषसिद्धीनंतर पुढीलप्रमाणे, शिक्षेस पात्र ठरेल :-
(a)(क)(अ) दुसऱ्यांदा केलेल्या अपराधाबद्दल, सहा महिन्यांहून कमी नाही व एक वर्षाहून जास्त नाही, इतक्या मुदतीचा कारावास व दोनशे रुपयांहून कमी नाही व पाचशे रुपयांहून जास्त नाही इतका द्रव्यदंडसुद्धा;
(b)(ख)(ब) तिसऱ्यांदा केलेल्या अपराधाबद्दल, किंवा तिसऱ्या वेळच्या अपराधानंतरच्या कोणत्याही अपराधाबद्दल, एक वर्षाहून कमी नाही व दोन वर्षाहून जास्त नाही इतक्या मुदतीचा कारावास व पाचशे रुपयांहून कमी नाही व एक हजार रुपयांहून जास्त नाही इतका द्रव्यदंडसुद्धा.)
——-
१. १९७६ चा अधिनियम क्रमांक १०६ याच्या कलम १४ अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.