Pcr act कलम १०: अपराधास अपप्रेरण :

नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५
कलम १०:
अपराधास अपप्रेरण :
या अधिनियमाखालील अपराधास जो कोणी अप्रेरणा देईल तो, त्या अपराधाकरिता उपबंधित केलेल्या शिक्षेस पात्र होईल.
१.(स्पष्टीकरण :
जो लोकसेवक या अधिनियमाखालील शिक्षापात्र अपराधाचे अन्वेषण करण्याच्या कामी बुद्धिपुरस्सर, उपेक्षा करील, त्याने या अधिनियमाखालील शिक्षापात्र अपाराधास अपप्रेरणा दिली असल्याचे मानण्यात येईल.)
——–
१. १९७६ चा अधिनियम क्रमांक १०६ याच्या कलम १२ अन्वये (१९-११-१९७६ पासून) समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply