प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०
कलम ८ :
मंडळाचा निधी :
मंडळाच्या निधीमध्ये शासनाने वेळोवेळी दिलेली अनुदाने आणि कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाने किंवा कोणत्याही अन्य व्यक्तीने दिलेले अंशदन, देणग्या, अभिदाने, मृत्युपत्रित देणग्या, दान आणि तत्सम गोष्टी यांचा समावेश होईल.