Pca act 1960 कलम ५ : मंडळाची घटना :

प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०
कलम ५ :
मंडळाची घटना :
(१) मंडळ, पुढील व्यक्तीचे मिळून बनलेले असेल –
(a)(क)(अ) वन महानिरीक्षक, भारत सरकार, पदसिद्ध;
(b)(ख)(ब) पशूसंवर्धन आयुक्त, भारत सरकार, पदसिद्ध;
(ba)१.(खक)(बअ) केंद्र सरकारने नियुक्त करावयाच्या अनुक्रमे गृह कार्य व शिक्षण यांचा व्यवहार पाहणाऱ्या केंद्र सरकारच्या मंत्रालयाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन व्यक्ती;
(bb)(खख)(बब) केंद्र सरकारने नियुक्त केलेली भारतीय वन्य जीव मंडळाचे प्रतिनिधित्व करणारी एक व्यक्ती;
(bc)(खग)(बक)केंद्र सरकारच्या मते प्राणी कल्याण कार्यात ज्या सक्रिय गुंतलेल्या आहेत व ख्यातनाम मानवतावादी आहेत किंवा असलेल्या अशा, केंद्र सरकारने नामनिर्देशित करावयाच तीन व्यक्ती;)
(c)(ग)(क) केंद्र सरकारच्या मते ज्याचे प्रतिनिधित्व मंडळावर असणे आवश्यक असेल अशा पशुवैद्यक व्यवसायींच्या संघटनेचे प्रतिनिधित्व करणारी, त्या संघटनेकडून विहित पद्धतीने निवडावयाची एक व्यक्ती;
(d)(घ)(ड) आधुनिक व देशी वैद्यक पद्धती या व्यवसायींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या, केंद्र सरकारने नामनिर्देशित करावयाच्या दोन व्यक्ती;
(e)२.(ङ) (इ) केंद्र सरकारच्या मते, मंडळावर प्रतिनिधित्व असावयास पाहिजे अशा दोन महानगरपालिकांपैकी प्रत्येक नगरपालिकेचे प्रतिनिधित्व करणारी, उक्त महानगरपालिकांपैकी प्रत्येक महानगरपालिकेने विहित केलेल्या रीतीने निवडावयाची एक व्यक्ती;)
(f)(च)(फ) केंद्र सरकारच्या मते, मंडळावर प्रतिनिधित्व असावयास पाहिजे अशी प्राणी कल्याणात सक्रिय असलेली तीन संघांपैकी प्रत्येकाचे प्रतिनिधित्व करणारी, उक्त संघापैकी प्रत्येक संघाने विहित केलेल्या रीतीने निवड करावयाची एक व्यक्ती;
(g)(छ)(ग) केंद्र सरकारच्या मते मंडळावर प्रतिनिधित्व असावयास पाहिजे अशी, प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याशी संबंधित अशा तीन सोसायट्यांपैकी प्रत्येकाचे प्रतिनिधित्व करणारी विहित रीतीने निवडावयाची एक व्यक्ती;
(h)(ज)(ह) केंद्र सरकारने नामनिर्देशित करावयाच्या तीन व्यक्ती;
(i)(झ)(आय) लोकसभेने निवडून द्यावयाचे चार आणि राज्यसभेने निवडून द्यावयाचे दोन असे संसदेचे सहा सदस्य;
(२) पोटकलम (१) च्या खंड (क) किंवा ३.(खंड (ख) किंवा खंड (खक) किंवा खंड (खख)) मध्ये निर्देशित केलेल्या कोणत्याही व्यक्ती, कोणत्याही अन्य व्यक्तीला मंडळाच्या कोणत्याही बैठकीने उपस्थित राहण्यासाठी प्रतिनियुक्त करू शकतील.
४.(३) केंद्र सरकार, मंडळाच्या एका सदस्याला अध्यक्ष म्हणून आणि मंडळाच्या दुसऱ्या एखाद्या सदस्याला उपाध्यक्ष म्हणून नामनिर्देशित करील.)
——–
१. १९८२ चा अधिनियम क्रमांक २६ याच्या कलम ५ द्वारे समाविष्ट करण्यात आले.
२. १९८२ चा अधिनियम क्रमांक २६ याच्या कलम ५ द्वारे मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
३. १९८२ चा अधिनियम क्रमांक २६ याच्या कलम ५ द्वारे मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
४. १९८२ चा अधिनियम क्रमांक २६ याच्या कलम ५ द्वारे मूळ खंडाऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply