Pca act 1960 कलम ५क(अ) : १.(मंडळाची पुनर्घटना :

प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०
कलम ५क(अ) :
१.(मंडळाची पुनर्घटना :
(१) केंद्र सरकार शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत (विशोधन) अधिनियम, १९८२ अमलात आल्यानंतर लवकरात लवकर ज्या तारखेस मंडळाची पुनर्घटना करील, त्याच तारखेपर्यंत मंडळाचा अध्यक्ष आणि इतर सदस्य पद धारण करतील व त्याच तारखेस त्यांचा पदावधी समाप्त होईल.
(२) पोटकलम (१) अन्वये पुनर्घटित करण्यात आलेले मंडळ पोटकलम (१) अन्वये त्याच्या पुनर्घटनेच्या दिनांकापासून दर तिसऱ्या वर्षाच्या समाप्तीला वेळोवेळी पुनर्घटित करण्यात येईल.
(३) पोटकलम (१) अन्वये पुनर्घटित केलेल्या मंडळाच्या सदस्यांमध्ये, अशी पुनर्घटना ज्या तारखेस अमलात यावयाची असेल त्या तारखेच्या लगतपूर्वी ज्या व्यक्ती मंडळाच्या सदस्य असतील त्या सर्व व्यक्तींचा समावेश असेल, पण अशा रीतीने पुनर्घटना करण्यात आली नसती तर जेवढ्या कालावधीसाठी त्यांनी पद धारण केले असते त्या कालावधीच्या न संपलेल्या कालावधीसाठीच फक्त पद धारण करतील आणि त्या व्यक्ती, मंडळाचे सदस्य असण्याचे बंद झाल्यामुळे निर्माण होणारी रिक्त पदे ही, अशा रीतीने पुनर्घटित केलेल्या मंडळाच्या मुदतीच्या उर्वरित कालावधीसाठी नैमित्तिक रिकामी पदे म्हणून भरण्यात येतील :
परंतु, या पोटकलमातील कोणतीही गोष्ट, प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत (विशोधन) अधिनियम, १९८३ याच्या कलम ५ खंड (क) उपखंड (दोन) द्वारे कलम ५ च्या पोटकलम (१) मध्ये केलेल्या विशोधनाच्या आधारे, जी मंडळाचा सदस्य असण्याचे बंद झाली असेल त्या व्यक्तीच्या संबंधात लागू होणार नाही.)
——-
१. १९८२ चा अधिनियम क्रमांक २६ याच्या कलम ६ द्वारे समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply