प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०
कलम ४१ :
१८९० चा अधिनियम ११ याचे निरसन :
या अधिनियमाच्या कलम १, पोटकलम (३) अन्वये काढण्यात आलेल्या अधिसूचनेत अनुसरून या अधिनियमाचा कोणताही उपबंध कोणत्याही राज्यात अंमलात असेल त्याबाबतीत प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम, १८९० (१८९० चा ११) याच्या अमलात असलेल्या उपबंधाशी समनुरूप असलेला कोणताही उपबंध त्यानंतर निरसित ठरेल.