प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०
कलम ४० :
क्षतिपूर्ती :
भारतीय दंड संहिता कलम २१ च्या अर्थांतर्गत जी कोणतीही व्यक्ती लोकसेवक आहे किंवा जिला लोकसेवक मानण्यात आले आहे तिने या अधिनियमाखाली सद्भावनापूर्वक केलेल्या किंवा करण्याचे उद्देशित असलेल्या कोणत्याही गोष्टीबाबत त्या व्यक्तीविरूद्ध कोणताही दावा, खटला किंवा अन्य न्यायालयीन कार्यवाही केली जाणार नाही.