प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०
कलम ३३ :
झडतीचे अधिपत्र :
(१) प्रथम किंवा द्वितीय वर्गाच्या दंडाधिकाऱ्यास किंवा इलाखा दंडाधिकाऱ्यास किंवा उपविभागीय दंडाधिकाऱ्यास किंवा पोलीस आयुक्तास किंवा जिल्हा पोलीस अधीक्षकास, त्यास मिळालेल्या माहितीवरून आणि त्यास आवश्यक वाटेल अशी चौकशी केल्यानंतर कोणत्याही ठिकाणी या अधिनियमाखाली अपराध घडत आहे किंवा घडण्याच्या बेतात आहे किंवा घडणार आहे असे मानण्यास कारण असेल तर तो एकतर स्वत: त्या ठिकाणी प्रवेश करू शकेल आणि झडती घेऊ शकेल किंवा उपनिरीक्षकाच्या दर्जाहून कमी दर्जाचा नाही अशा कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यास कोणत्याही ठिकाणी प्रवेश करण्यास किंवा झडती घेण्यास अधिपत्र काढून प्राधिकृत करू शकेल.
(२) १.(फौजदारी प्रक्रिया संहिता, १८९८ (१८९८ चा ५)) (आता १९७४ चा २) याचे झडत्या घेण्यासंबंधातील उपबंध जेथवर ते लागू करणे शक्य असेल तेथवर या अधिनियमाखाली घेण्यात येणाऱ्या झडत्यांना लागू होतील.
———
१.आता फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ पहा.