प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०
कलम २ :
व्याख्या :
या अधिनियमामध्ये संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर, –
(a)(क) (अ) प्राणी याचा अर्थ, मानवाहून अन्य असा कोणताही सजीव प्राणी, असा आहे;
(b)१.(ख)(ब) मंडळ याचा अर्थ कलम ४ अन्वये स्थापन केलेले आणि कलम ५-क अन्वये वेळोवेळी पुनर्घटित केल्याप्रमाणे असणारे मंडळ, असा आहे;)
(bb)२.(खख)(बब) बैलगाडी शर्यत याचा अर्थ, महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात, जिल्हाधिकाèयाच्या पूर्वमान्यतेने घेण्यात येईल अशा दिवशी, व अशा ठिकाणी, सांस्कृतिक आणि पारंपरिक प्रथा चालू ठेवण्याच्या हेतूने, गाडीवानासह किंवा गाडीवानाविना, भरविण्यात येणारी, वळू किंवा बैल यांचा सहभाग असलेली, – मग वळू किंवा बैल, गाडीला जोखडाच्या सहाय्याने जोडलेले असोत किवा नसोत, – शर्यत आयोजित करण्याचा एक उत्सव असा आहे, आणि तसेच, या शर्यतीस बैलगाडा शर्यत, छकडी आणि शंकरपट अशा नावांनी देखील ओळखले जाते;)
(c)(ग)(क) बंदिस्त प्राणी याचा अर्थ ज्याला बंदिस्त किंवा परिरूद्ध करून ठेवले असेल मग ते कायमचे असो किंवा तात्पुरते असो किंवा त्याला बंदिस्त किंवा परिरूद्ध अवस्थेतून निसटून जाण्यापासून अडथळा आणण्याच्या किंवा प्रतिबंध करण्याच्या प्रयोजनार्थ कोणत्याही उपयंत्राच्या किंवा यंत्रकाच्या अधीन असलेला किंवा ज्याच्या मुसक्या बांधून ठेवलेल्या आहेत किंवा जो विकलांग असल्याचे दिसून येते, असा कोणताही (पाळीव नसलेला) प्राणी, असा आहे;
(d)(घ)(ड) पाळीव प्राणी याचा अर्थ, माणसाच्या उपयोगाचे कोणतेही प्रयोजन साध्य करण्यासाठी जो पुरेसा माणसाळवलेला आहे किंवा ज्याला माणसाळवले आहे किंवा माणसाळवण्यात येत आहे किंवा जरी त्याला अशाप्रकारे माणसाळवले नसेल किंवा माणसाळवण्यात येत नसेल किंवा माणसाळवण्याचा उद्देश नसेल, तरी जा वस्तूत: पूर्णत: किंवा अंशत: माणसाळवला गेला आहे किंवा ज्याला माणसाळवण्यात आले आहे, असा कोणताही प्राणी, असा आहे;
(e)(ङ)(इ) स्थानिक प्राधिकरण याचा अर्थ, एखाद्या विनिर्दिष्ट स्थानिक क्षेत्रातील कोणत्याही बाबींचे नियंत्रण व प्रशासन जिच्याकडे त्या काळी कायद्याद्वारे विनिहित केलेले असेल अशी नगरपालिका समिती, जिल्हा मंडळ, किंवा अन्य प्राधिकरण, असा आहे;
(f)(च)(फ) मालक या शब्दाचा पशूंच्या संदर्भात उपयोग करताना त्यामध्ये केवळ मालकच नव्हे तर, त्या त्या काळी कब्जात किंवा अभिरक्षेत असणारी अन्य कोणतीही व्यक्ती मग मालकाची संमती असो किंवा नसो अंतर्भूत असेल;
(g)(छ)(ग) फुका किंवा डूमदेव यामध्ये दुभत्या प्राण्यांतील कोणताही दुभत्याच्या स्त्राव काढून टाकण्याच्या उद्देशाने त्या दुभत्या मादी प्राण्याच्या आंचळात हवा किंवा कोणताही पदार्थ सोडण्याच्या कोणत्याही प्रक्रियाचा समावेश आहे;
(h)(ज)(ह) विहित याचा अर्थ, या अधिनियमान्वये केलेल्या नियमाद्वारे विहित केलेले, असा आहे;
(i)(झ)(आय) रस्ता यामध्ये, कोणताही मार्ग, सडक, गल्ली, चौक, आवार, बोळ, खुला मार्ग, खुली जागा, मग ते सर्व रहदारीचे असोत किंवा नसोत जिथे लोकांना प्रवेश असेल, समाविष्ट आहे.
——-
१. १९८२ चा अधिनियम क्रमांक २६ याच्या कलम २ द्वारे मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४५ याच्या कलम २ द्वारे समाविष्ट करण्यात आले.