Pca act 1960 कलम २८ : धर्माने विहित केलेल्या ठार मारण्याच्या पद्धतीसंबंधीची व्यावृत्ती :

प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०
प्रकरण ६ :
संकीर्ण :
कलम २८ :
धर्माने विहित केलेल्या ठार मारण्याच्या पद्धतीसंबंधीची व्यावृत्ती :
या अधिनियमात अंतर्भूत असलेल्या कोणत्याही गोष्टीमुळे कोणत्याही समाजाच्या धर्माने आवश्यक असलेल्या पद्धतीने कोणत्याही प्राण्याला ठार मारणे, हा अपराध ठरणार नाही.
——–
कलम २८क(अ) :
१.(बैलगाडी शर्यती संबंधातील व्यावृत्ती :
या अधिनियमात अंतर्भूत असलेली कोणतीही गोष्ट, सांस्कृतिक व पारंपारिक प्रथा चालू ठेवण्यासाठी आणि त्यास चालना देण्यासाठी कलम ३ च्या पोटकलम (२) च्या तरतुदींनुसार आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतीला लागू होणार नाही आणि अशी बैलगाडी शर्यत आयोजित करणे हा, या अधिनियमान्वये अपराध ठरणार नाही.)
——–
१ २०१७ चा अधिनियम क्रमांक ४५ याच्या कलम ७ द्वारा समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply