Pca act 1960 कलम २२ : खेळ करून दाखवणाऱ्या प्राण्यांचे प्रदर्शन व प्रशिक्षण यांवर निर्बंध :

प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०
कलम २२ :
खेळ करून दाखवणाऱ्या प्राण्यांचे प्रदर्शन व प्रशिक्षण यांवर निर्बंध :
कोणतीही व्यक्ती, –
(एक) या प्रकरणाच्या उपबंधानुसार खेळ करणाऱ्या कोणत्याही प्राण्यास, त्याची नोंदणी केलेली नसेल तर;
(दोन) खेळ करणारा प्राणी म्हणून, ज्या प्राण्याला, केंद्र सरकार, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, प्रदर्शन करताना किंवा प्रशिक्षण देता न येणारा प्राणी म्हणून निर्दिष्ट करू शकेल, अशा कोणत्याही प्राण्याला खेळ करणारा प्राणी म्हणून,-प्रदर्शित किंवा प्रशिक्षित करणार नाही :
१.(परंतु, या कलमात अंतर्भूत असलेली कोणतीही गोष्ट, कलम ३ च्या पोटकलम (२) च्या तरतुदींनुसार केलेल्या बैलगाडी शर्यतीच्या आयोजनास लागू होणार नाही.)
——–
१. २०१७ चा अधिनियम क्रमांक ४५ याच्या कलम ५ द्वारा समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply