प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०
कलम १५क(अ) :
१.(उपसमित्या :
(१) समिती, आपल्या कोणत्याही शक्तींचा वापर करण्यासाठी किंवा तिच्या कोणत्याही कर्तव्याचे पालन करण्यासाठी किंवा समितीकडे विचारार्थ सोपविण्यात येईल त्या कोणत्याही प्रकरणाची चौकशी करण्यासाठी किंवा अहवाल तयार करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी तिला योग्य वाटतील तितक्या उपसमित्या घटित करू शकेल.
(२) उपसमितीमध्ये केवळ समितीच्या सदस्यांचाच समावेश असेल.)
——–
१. १९८२ चा अधिनियम क्रमांक २६ याच्या कलम १३ द्वारा समाविष्ट करण्यात आले.