Pca act 1960 कलम १३ : यातना होत असलेल्या प्राण्याचा नाश करणे :

प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०
कलम १३ :
यातना होत असलेल्या प्राण्याचा नाश करणे :
(१) एखाद्या प्राण्याचा मालक कलम ११ खालील अपराधाबद्दल सिद्धदोषी असेल त्या बाबतीत, प्राण्याला जिवंत ठेवणे क्रूरतेचे ठरणार असल्याबद्दल न्यायालयाची खात्री पटली असेल तर, त्याने प्राण्याचा नाश करण्याचा निदेश देणे आणि प्राण्याला तसे करण्यास योग्य असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीकडे सोपविणे आणि ज्या व्यक्तीकडे असा प्राणी त्या प्रयोजनार्थ सोपविण्यात आला आहे, तिने अशा प्राण्यांचा नाश करणे किंवा त्याला उगीचच यातना न देता अशा, प्राण्यांचा स्वत:च्या उपस्थितीत नाश करणे, कायदेशीर असेल आणि प्राण्यांचा नाश करण्यासाठी करण्यात आलेला कोणताही वाजवी खर्च मालकाकडून द्रव्यदंड म्हणून वसूल करण्याबाबत न्यायालयाकडून निदेश देण्यात येईल :
परंतु, मालक याच्याशी सहमत नसेल तर, त्या क्षेत्राच्या प्रभारी पशुवैद्यक अधिकाऱ्याने पुरावा दिल्याशिवाय या कलमाखालील कोणताही आदेश देता येणार नाही.
(२) कोणत्याही दंडाधिकाऱ्यास, पोलीस आयुक्तास किंवा जिल्हा पोलीस आयुक्तास असे समजण्यास कारण असेल की, कलम ११ अन्वये करण्यात आलेला एखादा अपराध कोणत्याही प्राण्याच्या संबंधातील आहे तर तो, त्याच्या मते प्राण्याला जिवंत ठेवणे क्रूरतेचे ठरणार असेल तर तशा प्राण्याचा ताबडतोब नाश करण्याबाबत आदेश देऊ शकेल.
(३) ज्याला अशा प्रकाराचा रोग किंवा अशा प्रकारची जबर इजा झालेली आहे किंवा त्याच्या मते क्रूरता दाखविल्याशिवाय दूर करता येणार नाही, अशा शारीरिक अवस्थेतील कोणताही प्राणी आढळेल, तो पोलीस शिपायाच्या वरच्या दर्जाचा कोणताही पोलीस अधिकारी किंवा याबाबतीत शासनाकडून प्राधिकृत करण्यात आलेली कोणतीही व्यक्ती, त्या प्राण्याचा मालक अनुपस्थित असेल किंवा त्याने प्राण्याला नष्ट करण्यास सहमती देण्याचे नाकारले असेल तर, जेथे असा प्राणी आढळेल त्या क्षेत्राच्या प्रभारी पशुवैद्यक अधिकाऱ्याला तात्काळ बोलावू शकेल, आणि प्राण्याला जिवंत ठेवणे क्रूरतेचे ठरेल अशी प्राणघातक इजा त्याला झालेली आहे किंवा अशाप्रकारे जबर इजा झाली आहे किंवा अशा प्रकारच्या शारीरिक अवस्थेत तो प्राणी आहे, असे पशुवैद्यक अधिकाऱ्याने प्रमाणित केले तर, पोलीस अधिकारी, किंवा यथास्थिती, प्राधिकृत करण्यात आलेली व्यक्ती, दंडाधिकाऱ्याचा आदेश मिळाल्यानंतर इजा झालेल्या किंवा इजा झाल्यामुळे नाा करावयाच्या प्राण्याचा १.(विहित करण्यात येईल अशा रीतीने) नाश करू शकेल.
(४) प्राण्याचा नाश करण्यासाठी दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या कोणत्याही आदेशाविरूद्ध अपील करता येणार नाही.
——–
१. १९८२ चा अधिनियम क्रमांक २६ याच्या कलम १२ द्वारा समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply