प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०
कलम १२ :
फुका किंवा डूमदेव करण्याबद्दल शिक्षा :
कोणतीही व्यक्ती, कोणत्याही गायीवर किंवा अन्य दुभत्या प्राण्यांवर, १.(त्याच्या दुग्धस्त्रवणात वाढ होण्यासाठी प्राण्यांच्या आरोग्यास घातक असणारी,) फुका किंवा १.(डूमदेव) या नावाने संबोधली जाणारी प्रक्रिया किंवा अन्य कोणतीही प्रक्रिया करील, १.(त्यात कोणत्याही पदार्थाच्या इंजेक्शनचा अतंर्भाव असेल) किंवा तिच्या ताब्यात असणाऱ्या किंवा नियंत्रणाखाली असणाऱ्या अशा कोणत्याही प्राण्यावर अशी प्रक्रिया करण्यास परवानगी देईल तर तो एक हजार रूपयांपर्यंत असू शकेल एवढ्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस किंवा दोन वर्षांपर्यंत असू शकेल एवढ्या कारावासाच्या शिक्षेस किंवा दोन्ही शिक्षांस पात्र असेल आणि ज्या प्राण्यावर अशी प्रक्रिया झाली होती तो प्राणी शासनाकडे समपहृत करण्यात येईल.
——–
१. १९८२ चा अधिनियम क्रमांक २६ याच्या कलम ११ द्वारा डूमदेव या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.