Passports act कलम ९ : पासपोर्ट आणि प्रवासपत्रे यांच्या शर्ती व नमुने :

पारपत्र अधिनियम १९६७
कलम ९ :
पासपोर्ट आणि प्रवासपत्रे यांच्या शर्ती व नमुने :
कोणत्या शर्तीच्या अधीनतेने व कोणत्या नमुन्यात पासपोर्ट किंवा प्रवासपत्र देण्यात येईल किंवा त्याचे नूतनीकरण करण्यात येईल ते विहित करण्यात येईल त्याप्रमाणे असेल :
परंतु, विविध वर्गाच्या पासपोर्टासाठी किंवा प्रवासपत्रांसाठी अथवा अशा प्रत्येक वर्गाखालील विविध प्रवर्गाच्या पासपोर्टासाठी किंवा प्रवासपत्रांसाठी वेगवेगळ्या शर्ती व वेगवेगळे नमुने विहित करता येतील :
आणखी असे की, पासपोर्ट किंवा प्रवासपत्र यांमध्ये विहित शर्तींखेरीज पासपोर्ट प्राधिकरण केंद्र शासनाच्या पूर्वमान्यतेने विशिष्ट प्रकरणी ठरवून देईल अशा आणखी इतर शर्तींचाही समावेश असेल .

Leave a Reply