Passports act कलम १४ : झडती घेण्याची आणि अभिग्रहण करण्याची शक्ती :

पारपत्र अधिनियम १९६७
कलम १४ :
झडती घेण्याची आणि अभिग्रहण करण्याची शक्ती :
(१) केंद्र शासनाने याबाबतीत सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे ज्याला शक्ती प्रदान केलेल्या असतील असा कोणताही सीमाशुल्क अधिकारी आणि फौजदाराच्या दर्जापेक्षा कमी दर्जाचा नसलेला १.(कोणताही पोलीस अधिकारी किंवा उत्प्रवासन अधिकारी) जर एखाद्या व्यक्तीने कलम १२ अन्वये शिक्षापात्र ठरणारा कोणताही अपराध केला असल्याचा वाजवी संशय तिच्याविरूद्ध असेल तर, कोणत्याही जागेची झडती घेऊ शकेल आणि अशा कोणत्याही व्यक्तीकडून तिचा कोणताही पासपोर्ट किंवा प्रवासपत्र सक्तीने ताब्यात घेऊ शकेल
(२) २.(फौजदारी प्रकिया संहिता, १९७३ (१९७३ चा २)) यात झडती व अभिग्रहण यासंबंधी असलेले उपबंध या कलमाखालील झडती व अभिग्रहण यांना शक्य तेथवर लागू होतील .
——-
१. १९९३ चा अधिनियम क्रमांक ३५ याच्या कलम ७ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
२. १९७८ चा अधिनियम क्रमांक ३१ याच्या कलम ४ अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply