Site icon Ajinkya Innovations

Npds act कलम ६६ : विशिष्ट प्रकरणांमध्ये दस्तऐवजासंबंधी गृहित धरणे :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ६६ :
विशिष्ट प्रकरणांमध्ये दस्तऐवजासंबंधी गृहित धरणे :
जेव्हा कोणताही दस्तऐवज –
एक) या अधिनियमान्वये किंवा इतर कोणत्याही कायद्यान्वये कोणत्याही व्यक्तीने सादर केला असेल किंवा तयार केला असेल किंवा कोणत्याही व्यक्तीच्या ताब्यातून किंवा नियंत्रणामधून तो जप्त करण्यात आला असेल यापैकी कोणत्याही प्रकरणात, किंवा
दोन) एखाद्या व्यक्तीने या अधिनियमान्वये केल्याचा आरोप असलेल्या कोणत्याही अपराधाच्या अन्वेषणाच्या ओघात भारताबाहेरील कोणत्याही ठिकाणाहून (केंद्र सरकारने विहित केले असेल अशा प्राधिकाऱ्याने किंवा व्यक्तीने आणि अशा रीतीने प्राधिकृत केलेली) मिळाला असेल आणि असा दस्तऐवज या अधिनियमाखालील कोणत्याही खटल्यात त्या व्यक्तीच्या विरूद्ध किंवा ती व्यक्ती व तिच्याबरोबर संयुक्तपणे न्यायचौकशी करण्यात येत असलेली इतर कोणतीही व्यक्ती यांच्याविरूद्ध आला असल्यास न्यायालयाने –
अ) त्या दस्तऐवजावरची सही आणि अशा दस्तऐवजांचा इतर प्रत्येक भाग जो एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या हस्ताक्षरात असल्याचे अभिप्रेत आहे तो तसा नसल्याचे सिद्ध केले नसल्यास, न्यायालयाला वाजवीरीत्या गृहित धरता येईल तितपत त्या व्यक्तीने सही केली असल्याचे किंवा तिच्या हस्ताक्षरात असल्याचे गृहित धरले पाहिजे आणि निष्पादित केलेल्या किंवा साक्षांकित केलेल्या दस्तऐवजाच्या बाबतीत तो ज्या व्यक्तीकडून अशा रीतीने निष्पादित किंवा साक्षांकित करण्यात आला असल्याचे गृहित धरले पाहिजे.
ब) योग्य रीतीने मुद्रांकित केलेला नसला, तरी तो दस्तऐवज पुरावा म्हणून अन्य प्रकारे अनुज्ञेय नसल्यास, पुरावा म्हणून दाखल करून घेण्यात येईल;
क) तसेच खंड (एक) खाली येणाऱ्या प्रकरणाच्या बाबतीत, त्याविरूद्ध सिद्ध करण्यात आले नसल्यास, अशा दस्तऐवजाचा मजकूर सत्य असल्याचे मानण्यात येईल.

Exit mobile version