गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ८अ :
१.(गुन्ह्यातून मिळालेल्या मालमत्ते बाबत विविक्षीत कृतींना मनाई :
कोणतीही व्यक्ती-
अ) या अधिनियमान्वये किंवा अन्य कोणत्याही देशाच्या सुसंगत कायाद्यान्वये घडलेल्या अपराधातील असल्याचे ज्ञात असतांना किंवा अशा अपराधात सहभाग असल्याचे किंवा मालमत्ता दडपण्याच्या किंवा बेकायदेशीररित्या तिच्यात फेरबदल करण्याचे हेतूने किंवा गुन्ह्यात सहभाग असलेल्या व्यक्तीस मदत करण्याच्या किंवा कायद्याचे परिणाम चुकविण्याचे हेतूने कोणत्याही मालमत्तेचे रूपांतर किंवा दुसऱ्यास निष्पादीत करणार नाही, किंवा
ब) या अधिनियमान्वये किंवा अन्य कोणत्याही देशाच्या सुसंगत कायद्यान्वये घडलेल्या अपराधातील असल्याचे ज्ञात असतांनाही अशा गुन्हातील मालमत्ता वास्तवतेपासून, स्त्रोतापासून, ठिकाणाहून किंवा कोणत्याही प्रकारे गमन करून दडपणार नाही किंवा बेकायदेशिरपणे फेरबदल करणार नाही, किंवा
क) या अधिनियमान्वये किंवा कोणत्याही देशाच्या सुसंगत कायद्यान्वये घडलेल्या अपराधातील असल्याचे ज्ञात असतांनाही अशा मालमत्तेचे संपादन, ताबा किंवा उपयोग करणार नाही.)
———
१. २००१ चा अधिनियम क्रमांक ९ याच्या कलम ५ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
