Ndps act कलम ७७ : नियम आणि अधिसूचना लोकसत्तेपुढे मांडणे :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ७७ :
नियम आणि अधिसूचना लोकसत्तेपुढे मांडणे :
या अधिनियमान्वये केंद्र सरकारने केलेला प्रत्येक नियम आणि कलम २ चा खंड (सात-अ), खंड (अकरा), खंड (तेवीस-अ) व कलम ३, कलम सात-अ, कलम नऊ-अ आणि कलम२७ चा खंड (अ) या अन्वये काढलेली प्रत्येक अधिसूचना ती करण्यात किंवा काढण्यात आल्यांनतर शक्य तितक्या लवकर, लोकसभेचे अधिवेशन चालू असताना संसदेच्या प्रत्येक सभागृहात एका सत्रात किंवा लागोपाठच्या दोन किंवा अधिक सत्रात मिळून एकूण वीस दिवसांच्या कालावधीसाठी मांडण्यात येईल. यापूर्वी म्हटलेल्या सत्राच्या किंवा नंतरच्या सत्राच्या पाठोपाठचे सत्र संपण्यापूर्वी जर त्या नियमात किंवा अधिसूचनेत कोणताही बदल करण्याबाबत दोन्ही सभागृहे समहत झाली किंवा तो नियम किंवा अधिसूचना करण्यात येऊ नये याबाबत दोन्ही सभागृहांचे एकमत झाले, तर तो नियम किंवा ती अधिसूचना अशा बदललेल्या स्वरूपात अमलात येईल किंवा यथास्थिती मुळीच अमलात येणार नाही. मात्र, अशा कोणत्याही बदलामुळे किंवा त्या नियमाखाली किंवा अधिसूचनेन्वये त्यापूर्वी करण्यात आलेल्या कोणत्याही गोष्टीच्या कायदेशीरपणास बाधा पोहोचणार नाही.

Leave a Reply