गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ७४ :
संक्रमणकालीन तरतुदी :
या अधिनियमाच्या प्रारंभाच्या लगेच पूर्वी या अधिनियमामध्ये ज्यासाठी तरतूद करण्यात आली आहे अशा बाबींच्या संबंधातील कोणतेही अधिकार वापरीत असलेला किंवा कोणतीही कर्तव्ये पार पाडीत असलेला कोणताही सरकारी अधिकारी किंवा अन्य कर्मचारी अशा प्रारंभाच्या वेळी या अधिनियमाच्या संबद्ध तरतुदींनुसार तो अशा प्रारंभाच्या लगतपूर्वी तो ज्या पदावर असेल त्याच पदावर आणि त्याच पदनामावर नेमण्यात आला असल्याचे मानण्यात येईल.
