Ndps act कलम ७१ : व्यसनाधीन व्यक्तींना शोधणे, त्यांच्यावर उपचार करणे इ. साठी आणि गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापार उत्तेजित करणारे पदार्थ पुरविण्यासाठी केंद्र स्थापन करण्याचे शासनाचे अधिकार :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ७१ :
व्यसनाधीन व्यक्तींना शोधणे, त्यांच्यावर उपचार करणे इ. साठी आणि गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापार उत्तेजित करणारे पदार्थ पुरविण्यासाठी केंद्र स्थापन करण्याचे शासनाचे अधिकार :
१) सरकारला व्यसनी व्यक्तींना शोधून काढणे, त्यांवर उपचार करणे, त्यांचे शिक्षण, नंतरची काळजी, पुनर्वसन व सामाजिक पुनर्मिलन इत्यादी गोष्टींसाठी आणि शासनाकडे नोंदणी करण्यात आलेल्या व्यसनाधीन व्यक्तींना आणि वैद्यकीय प्रयोजनासाठी आवश्यक असेल अशा बाबतीत संबंधित शासनाकडून विहित करण्यात येतील अशा अटींवर व अशा रीतीने कोणत्याही गुंगीकारक औषधी द्रव्याचा व मनोव्यापार उत्तेजक पदार्थाचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक वाटतील अशी केंद्र शासनाच्या स्वेच्छाधिकारात स्थापन करता येतील.
२) पोट कलम (१) मध्ये निर्दिष्ट केलेल्या केंद्राच्या आस्थापना, नेमणुका, परिरक्षण, व्यवस्थापन व देखभाल यासाठी आणि त्या केंद्रामधून गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांना उत्तेजन देणारे पदार्थ यांचा पुरवठा करण्यासाठी आणि अशा केंद्रामध्ये नेमणूक करण्यात आलेल्या व्यक्तींच्या नेमणुका, प्रशिक्षण, अधिकार-कर्तव्ये यासाठी तरतूद करणारे या अधिनियमाशी सुसंगत असे नियम शासन करू शकेल.

Leave a Reply