गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ६८-टी :
विशिष्ट अधिकाऱ्यांनी प्रशासकाला, सक्षम प्राधिकरणाला आणि अपील न्यायाधिकरणाला साहाय्य करणे :
या प्रकरणाखालील कोणत्याही कार्यवाहीसाठी कलम ६८ ग अन्वये नेमणूक करण्यात आलेला प्रशासक, सक्षम प्राधिकरण आणि अपील न्यायाधिकरण यांना सहाय्य करण्यासाठी पुढील अधिकाऱ्यांना याद्वारे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत आणि तसे फर्मावण्यात आले आहे:
अ) गुंगीकारके नियंत्रण केंद्राचे अधिकारी;
ब) सीमाशुल्क विभागाचे अधिकारी;
क) केंद्रीय उत्पादनशुल्क विभागाचे अधिकारी;
ड) आय-कर विभागाचे अधिकारी;
ई) परकीय चलन विनियमन अधिनियम, १९७३ (१९७३ चा ४६) याद्वारे नेमणूक करण्यात आलेले अंमलबजावणी अधिकारी;
फ) पोलिस – अधिकारी;
ग) गुंगीकारके विभागाचे अधिकारी;
ह) केंद्रीय आर्थिक गुप्तवार्ता केंद्राचे अधिकारी;
आय) महसुली गुप्तवार्ता संचालनालयाचे अधिकारी;
जे) या बाबतीत केंद्र शासन शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे विनिर्दिष्ट करील असे केंद्र सरकारचे किंवा राज्य सरकारचे अधिकारी.
