गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ६८-झेड :
विविक्षीत प्रकरणी मालमत्ता मुक्त करणे :
१) स्थानबद्द केलेल्या व्यक्तीचा स्थानबद्धता आदेश रद्द करण्यात आला असेल किंवा आदेश मागे घेण्यात आला असेल तर, जप्त किंवा जमा मालमत्ता मुक्त करण्यात येईल.
२) कलम ६८ अ च्या पोट कलम २ च्या खंड (कक) मध्ये नमूद करण्यात आलेल्या व्यक्तीची या अधिनियामाअन्वयेच्या किंवा अन्य कोणत्याही देशाच्या सुसंगत कायद्याच्या आरोपात निर्दोष मुक्तता करण्यात आली असेल, आणि अशा आदेशा विरूद्ध अपील केली नसेल किंवा अपील निकाली काढण्यात आली असेल किंवा अशा व्यक्ती विरूद्ध काढण्यात आलेला अटकेचा आदेश किंवा अधिकारपत्र मागे घेण्यात आला असेल तर, या प्रकरणान्वये जप्त किंवा जमा केलेली मालमत्ता मुक्त करण्यात येईल.
