गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ६८-ग :
या प्रकरणान्वये जप्त केलेल्या किंवा सरकारजमा केलेल्या मालमत्तेचे व्यवस्थापन :
१) केंद्र शासनाला, शासकीय राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून त्याला योग्य वाटतील इतक्या त्याच्या अधिकाऱ्यांची (शासनाच्या संयुक्त सचिवापेक्षा खालच्या दर्जाच्या नसतील अशा) प्रशासकाची कार्ये पार पाडण्यासाठी नेमणूक करू शकेल.
२) पोट कलम (१) अन्वये नेमणूक केलेला प्रशासक, पोटकलम ६८ फ किंवा ६८ आय च्या पोटकलम (१) अन्वये ज्या मालमत्तेच्या संबंधात आदेश काढण्यात आलेला असेल अशी मालमत्ता विहित करण्यात येईल अशा रीतीने आणि अशा शर्तींच्या अधीन राहून स्वीकारील आणि तिची व्यवस्था ठेवील.
३) केंद्र शासनाकडे जमा करण्यात आलेल्या मालमत्तेची विल्हेवाट करण्यासाठी केंद्र शासनाकडून निदेश देण्यात येतील असे उपायसुद्धा प्रशासक योजील.
