गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ६८-एस :
सक्षम प्राधिकरणाला माहीती :
१) इतर कोणत्याही कायद्यात काहीही अंतर्भूत असले, तरी सक्षम प्राधिकरणाला या प्रकरणाच्या प्रयोजनाकरिता उपयुक्त ठरेल किंवा त्याच्याशी संबद्ध आहे असे वाटेल अशी, अशा व्यक्तीच्या, मुद्याच्या किंवा बाबीच्या संबंधातली माहिती देण्यासाठी केंद्र शासनाच्या किंवा एखाद्या राज्य शासनाच्या किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा प्राधिकाऱ्याला बोलावण्याचे अधिकार सक्षम प्राधिकरणाला असतील.
२) कलम ६८ टी मध्ये निर्दिष्ट केलेला प्रत्येक अधिकारी, त्याच्याकडे उपलब्ध असलेली कोणतीही माहिती या प्रकरणाच्या प्रयोजनाकरिता सक्षम प्राधिकरणाला उपयुक्त ठरेल असे त्याचे मत असल्यास, अशी कोणतीही माहिती स्वत:हून सक्षम प्राधिकरणाला पुरवील.
