गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ६८-एल :
विशिष्ट न्यास मालमत्तेच्या बाबतची कार्यपद्धती :
कलम ६८ बच्या खंड (ब) चा उपखंड (सहा) यामध्ये निर्दिष्ट करण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीत, सक्षम प्राधिकरणासमोर उपलब्ध असलेल्या माहितीच्या व सामग्रीच्या आधारावरून न्यासामध्ये धारण करण्यात आलेली कोणतीही मालमत्ता ही बेकायदेशीरपणे संपादित केलेली मालमत्ता आहे असे मानण्यास सक्षम प्राधिकरणाला कारण असेल अशा मानण्याचे कारण लेखी नमूद करणे आवश्यक आहे) तर अशा प्राधिकरणाला त्या न्यासाच्या संस्थापकावर किंवा अशी मालमत्ता ज्या मत्तेमधून किंवा जिच्याद्वारे न्यासाने किंवा विश्वस्ताने संपादित केली असेल अशा मत्तेच्या वर्गणीदारावर सक्षम प्राधिकरणाला नोटीस बजावता येईल आणि अशी मालमत्ता जिच्यामधून किंवा जिच्या आधारे संपादित केली असेल अशा पैशांचा किंवा इतर मत्तांचा साधनमार्ग किंवा यथास्थिती अशी मालमत्ता संपादित करण्यासाठी न्यासामध्ये वर्गणी भरलेला पैसा किंवा इतर मत्ता यांचा साधनमार्ग कोणता हे स्पष्ट करण्यासाठी नोटिशीमध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या तीस दिवसांच्या कालावधीत आपल्यासमोर बोलावू शकेल आणि त्यानंतर अशी नोटीस ही कलम ६८ ह अन्वये बजावण्यात आलेली नोटीस असल्याचे मानण्यात येईल आणि या प्रकरणाच्या इतर सर्व तरतूदी तदनुसार लागू होतील.
स्पष्टीकरण – या कलमाच्या प्रयोजनासाठी न्यासामध्ये धारण केलेल्या मालमत्तेच्या संबंधात बेकायदेशीरपणे संपादित केलीली मालमत्ता यामध्ये –
एक) जी मालमत्ता न्यासाच्या संस्थापकाकडून किंवा अशी मालमत्ता न्यासामध्ये वर्गणी म्हणून भरलेल्या कोणत्याही व्यक्तीने धारण करणे चालू ठेवले असते, तर अशा न्यास संस्थापकांच्या किंवा वर्गणीदारांच्या संबंधात जी बेकायदेशीरपणे संपादित केलेली मालमत्ता ठरली असती अशी कोणतीही मालमत्ता;
दोन) कोणत्याही व्यक्तीने भरलेल्या वर्गणीतून न्यासाने संपादित केलेली मालमत्ता जर अशा व्यक्तीने अशा वर्गणीतून संपादित केली असती, तर ती बेकायदेशीरपणे संपादित केलेली मालमत्ता ठरली असती अशी कोणतीही मालमत्ता.
