गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ६८-एक्स :
नोटिसा व आदेश बाजवणे :
या प्रकरणाअन्वये काढलेली कोणतीही नोटीस किंवा दिलेला कोणताही आदेश-
अ) ती नोटीस किंवा आदेश ज्या व्यक्तीसाठी असेल तिच्याकडे किंवा तिच्या एजंटाकडे प्रत्यक्ष देऊन किंवा नोदणीकृत डाकेने पाठवून;
ब) खंड (अ) मध्ये तरतूद करण्यात आलेल्या रीतीने नोटीस किंवा आदेश बजावणे शक्य झाले नाही, तर ती नोटीस किंवा तो आदेश ज्या मालमत्तेच्या संबंधात काढण्यात किंवा देण्यात आला असेल तिच्या ठळक जागी चिकटवून किंवा ती नोटीस किंवा तो आदेश ज्या व्यक्तीला उद्देशून असेल अशी व्यक्ती शेवटी राहत असल्याचे, किंवा व्यवसाय करीत असल्याचे किंवा फायद्यासाठी व्यक्तीश: काम करीत असेल अशा जागेतील ठळक जागी चिकटवून, बजावता येईल.
