गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ६८ :
अपराध केल्याची माहिती :
या अधिनियमाच्या तरतुदीन्वये किंवा त्याखाली करण्यात आलेल्या कोणत्याही नियमान्वये किंवा आदेशान्वये सोपवण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून कृती करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याला कोणताही अपराध घडल्याची माहिती त्याला कशी मिळाली याबाबतची माहिती सांगण्यास भाग पाडण्यात येणार नाही.
