गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ६७ :
माहिती इत्यादी मागविण्याचा अधिकार :
कलम ४२ मध्ये निर्दिष्ट केलेल्या केंद्र किंवा यथास्थिती राज्य शासनाने याबाबतीत प्राधिकृत केला असेल अशा कोणत्याही अधिकाऱ्याला या अधिनियमाच्या कोणत्याही तरतुदीच्या भंगाच्या बाबतीत कोणत्याही चौकशीच्या ओघात –
अ) या अधिनियमाच्या कोणत्याही तरतुदीचे किंवा त्याखाली केलेल्या कोणत्याही नियमाच्या किंवा आदेशाचा भंग झाला आहे किंवा नाही याबाबत स्वत:चे समाधान करून घेण्यासाठी माहिती मागवता येईल.
ब) चौकशीसाठी उपयुक्त किंवा तिच्याशी संबंद्ध असा कोणताही दस्तऐवज किंवा वस्तू सादर करण्यास किंवा देण्यास फर्मावता येईल;
क) प्रकरणाची वस्तुस्थिती आणि परिस्थिती यासंबंधीची माहिती असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची तपासणी घेता येईल.
